निलेश एस. बहिरशेट – जैन हे NISM प्रमाणित रिसर्च ॲनॅलिस्ट,NISM प्रमाणित म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असून 8 वर्षांपासून ते शेअर बाजार प्रशिक्षण क्षेत्रात सक्रिय असून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
निलेश यांनी BCS (Bachelors In Computer Science ) व MCA (Masters In Computer Application ) पदवी प्राप्त केली आहे. शिक्षणानंतर त्यांनी आयटी उद्योगात उत्तम अनुभव घेतला असून, निलेश यांचा IT उद्योग क्षेत्रात 7 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे.
प्रोग्रॅमर, टीम लीडर आणि प्रोजेक्ट मॅनेजर अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. निलेश यांनी CRM Applications, मेल Applications, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर्स यांसारखी अनेक सॉफ्टवेअर्स डेव्हलप केली आहेत. मोठ्या व गुंतागुंतीच्या प्रोजेक्ट मध्ये काम करण्याचा अनुभव आहे.
याच बरोबर डिजिटल आणि सोशल मीडिया मार्केटिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI ) या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे .
गेल्या 7 वर्षांपासून ते शेअर बाजार प्रशिक्षण क्षेत्रात सक्रिय असून हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
शेअर बाजार, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, एआय टूल्स आणि डिजिटल मार्केटिंग या सर्व क्षेत्रातील त्यांचा बहुआयामी अनुभव त्यांना एक गतिमान व्यावसायिक बनवतो.